यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न...



२० जानेवारी ते २६ जानेवारी २०१७ दरम्यान सुरु झालेल्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता नुकतीच करण्यात आली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पुणे फिल्म फाऊंडेशन , मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगला होता. २६ जानेवारी २०१७ रोजी महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांच्या हस्ते सांगता करण्यात आली.

चिली देशातील संगीत दिग्दर्शक जॉर्ज ऍरिगडा यांचा मास्टर क्लास ‘म्युझिक ऍन्ड साऊंड इन सिनेमा’ या विषयावर २1 जानेवारी सायंकाळी झाला. चित्रपटांमध्ये कशा प्रकारचे संगीत वापरले जाते. संगीत वापरताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो,या संगीतक्षेत्रातील महत्वाच्या बाबी चित्रपटांचे दृश्य दाखवून त्यांनी सांगितल्या.

यावर्षीच्या`स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेस’ प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे व्याख्याते म्हणून लाभले होते. ‘’मी सिनेमाकडे कसा पाहतो’’ ह्या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. यावेळी ते हिंदी सृष्टीतील स्त्रिया साचेबंध भूमिके बद्दल बोलताना दिसले.
माननीय शरद पवार यांचे मिळालेल्या पद्मविभूषण पुरस्काराबद्दल अभिनंदन करून. हा महोत्सव करण्यामध्ये अनेक जणांची मेहनत आहे त्या सर्वांना व चित्रपट रसिकांनी दिलेली प्रचंड प्रतिसाद बद्दल त्याचे आभार व महोत्सवातआम्ही नेहमीच जगभरात बनवले जाणारे दर्जेदार चित्रपट रसिकांसाठी आणू. तर पुढच्यावर्षी हा महोत्सव १९ जानेवारी ते २५ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. असे प्रतिपादन महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी केले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft