चिली संगीत दिग्दर्शक जॉर्ज ऍरिगडाचे सिनेरसिकांना मार्गदर्शन...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पुणे फिल्म फाऊंडेशन व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 'यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७' , यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सध्या सुरू असून, आज चिली देशातील संगीत दिग्दर्शक जॉर्ज ऍरिगडा यांचा मास्टर क्लास ‘म्युझिक ऍन्ड साऊंड इन सिनेमा’ या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे कार्यक्रमामध्ये त्यांनी संगीतातील काही मोजके घटक सिनेरसिकांना समजावून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. चित्रपटांमध्ये पडद्यामागील संगीत कसे असायला हवे? हे सुरुवातीला स्पष्ट केले. संगीत क्षेत्रामधील त्यांनी चित्रफिती दाखवून त्यावर मार्गदर्शन तसेच उपस्थितांच्या शंका-समाधान केले. आपल्या शंकाना योग्य उत्तर दिल्याने संगीत रसिक सुखावून गेले

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft