सोन्याचा व्यवसायातला सोन्यासारखा माणूस

रुपयाचे आता मोल राहिलेले नसले तरी ज्याला रुपयाची किंमत कळाली तोच खरा श्रीमंत..

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवारी २५ नोव्हेंबर २०१६ रोजी पार पडला. त्यावेळी खासदार व प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी स्वागत व प्रास्ताविक म्हणून प्रतिष्ठानच्या उपक्रमाविषयी सांगताना त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आता १२ विभागीय केंद्र सुरु झाले आहेत. प्रतिष्ठानतर्फे शेतीकट्टा तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिला पुनर्वसन उपक्रम 'उमेद'च्या माध्यमातून त्यांची मदत करणे त्यांना जगण्याची उमेद देणे अशा २०० महिलांना प्रतिष्ठाने दत्तक घेतले आहे. तसेच मा. शरदचंद्रजी पवार यांच्या कायदेमंडळातील पाच दशके २२ फेब्रुवारी २०१७ ला पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यस्तरीय शालेय निबंध स्पर्धा व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावी असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच न्यायमूर्ती वाय्. व्ही. चंद्रचूड पारितोषिक प्राप्त नेहा भंडारी यांचेही कौतुक त्यांनी केले.

 

  राज्सस्तरीय मानपत्र     वार्तापत्र (२५ नोव्हेंबर २०१६)

"सह्याद्रीचे वारे" ऑडिओ सीडीचे प्रकाशन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने नॅबच्या सहकार्याने अंधांसाठी "सह्याद्रीचे वारे" या ऑडिओ सीडीचे प्रकाशन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

न्यायमूर्ती वाय्. व्ही. चंद्रचूड पारितोषिक प्रदान..
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा न्यायमूर्ती वाय्. व्ही. चंद्रचूड पारितोषिक नेहा भंडारी यांना अनिल काकोडकरांच्या हस्ते देण्यात आला.

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 'नंदन निलेकणी' यांना..
आधार कार्डचे जनक नंदन निलेकणी यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार या कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. पुरस्कार समितीचे अध्यक्ष व शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी पुरस्काराची घोषणा केली. १२ मार्चला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहातील कार्यक्रमात नंदन निलेकणी यांना हा पुरस्कार देण्यात येईल.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०१६
यशवंतराव चव्हाण यांच्या ३२ व्या पुण्यतिथी निमित्त यशवंतराव चव्हाण 'राज्सस्तरीय पुरस्कार २०१६' सुवर्ण उद्योजक व साताऱ्याच्या खानापूर विद्यापीठातील पारे गावचे सुपुत्र प्रतापशेठ साळुंखे यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दोन लाख रुपये, मानपत्र देऊन साळुंखेंचा सत्कार करण्यात आला. या वेळी पवारांनी सातारा, सांगलीच्या दुष्काळी भागांमधील लोकांच्या आत्मविश्वासाची कथा उपस्थितांसमोर मांडली. नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, ग.दि.माडगूळकर असे एकापेक्षा एक हिरे जन्माला आले ते याच भागातून. याच प्रदेशातील एका जिद्दी माणसाने अविरत परिश्रमाच्या जोरावर साऱ्या भारतात सुवर्णउद्योग उभारला. मुख्य म्हणजे स्वत: उद्योग उभारताना आपल्या आजूबाजूचे लोक उभे राहतील, यासाठीही साळुंखेंनी मेहनत घेतली. त्यांची देशपातळीवर संघटना बांधली, याकडे पवारांनी लक्ष वेधले.

आटपाडी, माण, खटाव, जत या दुष्काळी भागातील माणसांना प्रतिकूल परिस्थितीत चिकटपणे कसे जगायचे हे आपसूक कळते. गेल्या काही वर्षांतील दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्यांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशामधील माणसांच्या जिद्दीची कायम उदाहरणे देता येतील. "आत्मविश्वासाची कमतरता असणारी माणसे आत्महत्या करतात", पण आपल्या भागात काही पिकत नसताना साळुंखेंनी सोने-चांदी गलाई म्हणजे शुद्धीकरणाच्या व्यवसायात उतरताना दक्षिण भारत पादाक्रांत केला. भारतभर साळुंखे यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे, असे पवार म्हणाले.

पुरस्कार रक्कमेचा ट्रस्टसाठी वापर करून त्यामधून गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यात येईल, अशी घोषणा साळुंखेंनी आपल्या मनोगतात केली. या वेळी त्यांनी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या समस्या सोडवण्याची विनंती पवार यांना केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले.

 

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft