'ओर्चीड इरा' या नियातकालिकास द्वितीय पारितोषिकसोलापूर येथील नागेश कराजगी ओर्चीड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यांच्या 'ओर्चीड इरा' या नियातकालिकास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नियतकालिक स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. याचा पुरस्कार वितरण समारंभ आज मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी ज्येष्ठ संपादक पद्मभूषण देशपांडे, प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, प्राचार्य डॉ.जे.बी.डाफेदार, सोलापूर केंद्राचे सचिव दिनेश शिंदे, सदस्य दत्ता गायकवाड, विजय कान्हेकर, नीलेश राऊत, श्रीकांत देशपांडे, सुहास काळे, प्रा. बी. आर. बिराजदार, प्रा. शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

याप्रसंगी या नियतकालिकात ज्या विद्यार्थ्यांनी लेख लिहिले त्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

राधाबाई काळे महिला महाविद्यालयाला नियतकालिक स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक


अहमदनगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाने राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.आज या महाविद्यालयात या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.रयत शिक्षण संस्थेचे हे महाविद्यालय आहे.

ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे व प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी उपस्थित विद्यार्थिनींसोबत संवाद साधला.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, विजय कान्हेकर, ज्येष्ठ पत्रकार महेश कुलकर्णी, कवी संजीव तनपुरे, अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, राहुल राजळे, अंकाचे संपादक डॉ.संजय नगरकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नाशिक येथील 'बांधिलकी' नियतकालिकास पारितोषिक वितरणनाशिक : यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय नियतकालिक स्पर्धेचा प्रथम पारितोषिक वितरण कार्यक्रम ता. देवळा, जि.नाशिक येथील कर्मवीर रामराव आहेर महाविद्यालयात आज संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. पद्मभूषण देशपांडे, कार्यक्रम संयोजक मा.दत्ता बाळसराफ, मा. विजय कान्हेकर, मा. नीलेश राऊत, प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर, संस्थेचे सचिव गंगाधरमामा शिरसाठ, आणि प्रा.एकनाथ पगार मान्यवर उपस्थित होते.

या महाविद्यालयाचे 'बांधिलकी' नावाचे नियतकालिक दैनंदिनी विशेषांकावर आधारित आहे. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लालसगाव मधील वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास नियतकालिक पारितोषिक प्रदाननाशिक : यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय नियतकालिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम नाशिक येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव मध्ये आज संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. पद्मभूषण देशपांडे, कार्यक्रम संयोजक मा.दत्ता बाळसराफ, मा. विजय कान्हेकर, मा. नीलेश राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

नियतकालिक स्पर्धा २०१७ पारितोषिक वितरण सोहळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे नियतकालिक स्पर्धा २०१७ पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर येथे २० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०१८ दरम्यान केले आहे.

पहिला कार्यक्रम २० फेब्रुवारीला कर्मवीर रामरावजी आहेर कला व वाणिज्य महाविद्यालय, देवळा, नाशिक येथे होईल. त्यानंतर दुसरा कार्यक्रम दुपारी १२ वाजता नूतन विद्या प्रसारक मंडळाचे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव, नाशिक येथे होईल. तिसरा कार्यक्रम २१ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहमहनगर येथे होईल. तर चौथा कार्यक्रम २२ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता नागेश कराजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी, सोलापूर येथे होईल.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft