शब्द - सूरांचे सुरेख संमेलन संपन्न...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि रंगस्वर यांच्या संयुक्त विद्यमाने "शब्द सूरांचे सुरेख संमेलन" १० मे रोजी संपन्न झाले. यावेळी रेखा नार्वेकर यांच्या "आठवणीच्या जलाशयावर" या गीत संचाचे प्रकाशन ज्येष्ठ संगीतकार अशोकजी पत्की यांच्या हस्ते झाले. साहित्य आणि संगीत या दोन्ही कला आजच्या गतिमान जीवनात खूप आवश्यक आहेत असे रेखा नार्वेकर यांनी सांगितले. ममता कानडे यांनी प्रास्ताविक केले. संगितकार अशोक पत्की यांनी आपल्या भाषणात जुने संगीत आणि आताचे संगीत यात कसे अंतर आहे हे सांगितले.  कार्यक्रमाला युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे राजन प्रभू तसेच सीमा चंद्रगुप्त, मानसी, सोमेश, भगवंत नार्वेकर आणि मंदार आपटे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मृण्मयी भजक यांनी केले.

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे ,
कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft