'आरती थाळी सजावट' विनामूल्य कार्यशाळा संपन्न...

51475128 1058816140993364 7755786973146513408 o

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे विनामूल्य आरती थाळी सजावट या एकदिवसीय विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 'क्रिएटिव्ह आर्ट, ऑफ वीणा म्हात्रे संस्था' च्या संस्थापिका विणा म्हात्रे या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका होत्या. त्यांनी उपस्थित महिलांना उत्तमरित्या मार्गदर्शन केले. महिलांनी या कार्यशाळेला अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याने सदर कार्यशाळा उत्साहवर्धक स्थितीत पार पडली.

को-ऑपरेटिव्ह सोसायटीला जीएसटी रजिस्ट्रेशन
करणे आवश्यक आहे...रमेश प्रभू


IMG 20190206 161123

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे बुधवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी को-ऑपरेटिव्ह सोसायटी संबंधीत इनकम टॅक्स आणि जीएसटी या विषयावरती विनामूल्य मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन (MSWA) चे अध्यक्ष, सीए रमेश प्रभू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. GST कधी भरावा लागतो? का भरावा लागतो? किती मर्यादेपर्यंत GST भरणे अनिवार्य आहे? अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले.

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे ,
कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft