आता शिका शनिवार-रविवार सोसायटी व्यवस्थापनाचे धडे...

IMG 20190315 WA0000

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे 'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण’ या विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक १ जून ते २८ जुलै २०१९ या कालावधी मध्ये (शनिवार-रविवार) दुपारी ११ ते ५ या वेळेमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील बेसमेंट हॉल मध्ये प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार असून प्रशिक्षण शुल्क १०,०००/- भरून सहभागी होता येईल. कोर्स पूर्ण झाल्यानंतर परिक्षा घेण्यात येईल तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी कृपया संजना पवार यांच्याशी ( दूरध्वनी – २२०४५४६०, २२०२८५९८, विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६) वर संपर्क साधावा.

"महिला गौरव पुरस्कारा"ला अभिनेत्री सीमा देशमुख यांची उपस्थिती...

WhatsApp Image 2019 03 09 at 1.08.08 PM 1


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे 'महिला गौरव पुरस्कार 'चे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे यंदाचे पहिलेच वर्ष होते. कार्यक्रमाची सुरुवात शारदास्तवनाने व दीप प्रज्वलाने झाली. यानंतर संयोजिका रेखा नार्वेकर यांच्या हस्ते प्रास्ताविक व ग्रंथ प्रदान करण्यात आले. महिला गौरव पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन जयश्री आपटे यांनी केले. यंदाचा 'महिला गौरव पुरस्कार' समाजसेवाव्रती श्रीमती अनुसया पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच अ‍ॅड. सविता प्रभुणे यांनी उपस्थित महिलांना भारतीय दंडविधान कलम ४९७ बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती सीमा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. विजया वाड यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे , कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft