मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉप

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉपचे आयोजन ४ जून व ८ जून असे दोन दिवस यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये व्हाट्सअप्प, फेसबूक, आणि ट्विटर सोबत स्मार्ट फोन बाबत परिपुर्ण माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. तसेच टॅक्सी बूक करणे, गूगल मॅप शोधून काढणे, बूक माय शो, एम-इंडिकेटर, स्विगी, बीग मार्केट आणि पेटीएम इ. अॅपची माहिती सुध्दा दिली जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून १२०० रूपये शुल्क आकारले जाईल. संपर्क संजना - ८२९१४१६२१६आहे. संपर्क राजू देसले - ७७२००५२५७२

वृद्धत्व विरोधी वैद्यकीय व नैसर्गिक उपचार याविषयी डॉ पूर्णिमा म्हात्रे मार्गदर्शन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठतर्फे वृद्धत्व विरोधी वैद्यकीय व नैसर्गिक उपचार याविषयी मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे होते. २२ वर्ष स्वत: त संशोधन करून तयार केलेल्या औषधांनी रूग्णांवरती कशा पध्दतीने उपचार केले, आणि काम करत असताना आलेले अनुभव डॉ पूर्णिमा म्हात्रे यांनी उपस्थितांना सांगितले.

प्रख्यात मेडीकल कॉस्मोलोजीस्ट डॉ पूर्णिमा म्हात्रे यांच्या मुंबईमध्ये क्लिनिक जॉरजेअस नावाच्या ब-याच ठिकाणी शाखा आहेत. या शाखांमध्ये मुंबईतील विविध ठिकाणाहून उपचारांसाठी लोक येत असतात. चेह-यावरचे डाग, केस गळणे, वजन कमी करणे आणि बदलत्या शैलीनूसार फीट राहणे यासाठी माझा सल्ला घेऊन उपचार घेत असतात असं म्हात्रे म्हणाल्या.

वैद्यकीय आणि नैसर्गिक उपचारानंतर रूग्णांवरती २२ वर्षांच्या कालावधी मध्ये काणताही साईड इफेक्ट झाला नाही. तसेच उपचारानंतर रूग्ण खूष होतात. असंही म्हात्रे त्यांनी सांगितलं. विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अचूक उत्तरेही दिली.

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे ,
कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft