"पौष्टिक सॅलडस्"बाबत महिलांना मार्गदर्शनसध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या खाण्याच्या म्हणजेच आहाराच्या सवयी बदलल्या आहेत. जंक फूड व फास्टफूड मुळे स्वत:च्या आरोग्याकडे व आहाराकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचे दुष्परिणाम फार त्रासदायक होतात. तेव्हा आपल्या आहाराविषयी सतर्क रहाणे फार गरजेचे आहे. चौकस आहारात सॅलडचे फार महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई महाराष्ट्र महिला व्यासपीठतर्फे सुप्रसिध्द शेफ तुषार प्रीती देशमुख यांचा "आई आणि स्वयपांक घर" हा मनोगत, गप्पा व प्रश्न उत्तरे व पदार्थ्यांची पाककृती असा चौरस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुरूवातीला महाराष्ट्र महिला व्यासपीठ विभागाच्या संयोजिका रेखा नार्वेकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले, आणि कार्यक्रमाला सुरूवात झाली. सुप्रसिध्द शेफ तुषार प्रीती देशमुख यांनी आपली ओळख सांगून आज कोणती पौष्टिक सॅलडस् तयार करणार आहोत याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर सोबत आणलेल्या सॅलड वस्तू दाखवल्या, तसेच त्यांनी पडवळ कोशिंबीर, व्हेजिटेबल सलाड, चंक सलाड आणि स्प्राऊट स्पाईस हे सॅलड उपस्थित महिला समोर तयार केले. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांचे नेमके उत्तर देशमुख दिले.

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे ,
कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft