रमेश प्रभू यांचे वस्तू व सेवा कर या विषयावर मार्गदर्शन



यशवंतराव प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे प्रभाकर चुरी यांचे सहकारी गृहनिर्माण संस्थांतील निवडणूक प्रक्रिया व रमेश प्रभू यांचे वस्तू व सेवा कर या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. वस्तू आणि सेवा कराची संपूर्ण माहिती या कार्यक्रमात मार्गदर्शक रमेश प्रभू यांनी दिली. विशेषम्हणजे जीएसटी संदर्भात मार्गदर्शन असल्यामुळे कार्यक्रमाला अधिक उपस्थिती होती.

वस्तू सेवा कर म्हणजे नेमकं काय ? या प्रश्नापासून रमेश प्रभू यांनी मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. वस्तू सेवा करा मध्ये असलेल्या प्रकारांची सविस्तर माहिती त्यांनी सांगितली. त्यानंतर त्यांनी २० लाख रूपयांच्या वरती वार्षिक उलाढाल होत असलेल्या कंपनीला ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे असंही आवर्जून सांगितलं.

केंद्र सरकारने लावलेल्या कराची रक्कम राज्य सरकारला किती जाते आणि केंद्र सरकारला किती जाते, याची सुध्दा माहिती त्यांनी उपस्थितीत वर्गाला दिली. खासकरून एखाद्या राज्यामधून दुस-या राज्यामध्ये झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराला इंटिग्रेटेड कर म्हणतात. या करांची रक्कम थेट केंद्रसरकारला जमा करावी लागते. असं ही ते म्हणाले.

सहकारी गृहनिर्माण संस्थांतील निवडणूक प्रक्रिया या विषयावर प्रभाकर चुरी यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिली.

महिला व्यासपीठातर्फे वस्तू व सेवा कर या विषयावर व्याख्यान

यशवंतराव प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे प्रभाकर चुरी यांचे सहकारी गृहनिर्माण संस्थांतील निवडणूक प्रक्रिया व रमेश प्रभू यांचे वस्तू व सेवा कर या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ११ सप्टेंबरला दुपारी २ वाजता या व्याख्यानाला सुरूवात होईल. संपर्क - २२०४५४६०, ८२९१४१६२१६.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft