नवमहाराष्ट्र युवा अभियान व सम्यक संवाद आयोजित लोकसंवाद .....

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभाग नवमहाराष्ट्र युवा अभियान आणि सम्यक संवाद आयोजित ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत आज महाश्वेतादेवी यांना आदरांजली देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तसेच सूत्रसंचालन सम्यक संवादच्या सोनाली शिंदे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी केले. महाश्वेतादेवी यांच्या जीवनातील संघर्ष व कार्य या विषयावर चर्चा करण्यात आली. ही चर्चा करतांना मा. प्रा. इलीना सेन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महाश्वेतादेवी ह्या फ़क़्त लेखिका किंवा सामाजिक कार्यकर्त्याच नव्हत्या तर त्या एक पत्रकार, साहित्यिक तसेच विचारवंत व आंदोलनधर्मी ही होत्या. इ.स. २००२ मध्ये साहित्यातील योगदानाबद्दल यांना ऑफिसर ऑफ आर्टस अँड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर केला गेला होता.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft