crear sitio web con WordPress

 

तसेच प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेचा निकालही जाहीर झाला असून यात कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळा, जि. नाशिक यांच्या ‘बांधिलकी’ या नियतकालिकास प्रथम पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु. १० हजार रोख व प्रमाणपत्र असे आहे. नूतन महाविद्यालय, सेलू, जि. परभणी यांच्या ‘प्रेरणा’ नियतकालिकास द्वितीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु. ७ हजार रोख आणि प्रमाणपत्र असे आहे.कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, विद्यानगरी, बारामती जि. पुणे यांच्या ‘विद्यादीप’नियतकालिकास तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु. ५ हजार रोख व प्रमाणपत्र असे आहे. कत्रुवार कला, रतनलाल काबरा विज्ञान आणि बी. आर. मंत्री वाणिज्य महाविद्यालय मानवत, परभणी यांच्या ‘मानवता’ या नियतकालिकास तर कर्मवीर भाऊराव पाटील माविद्यालय, उरून-इस्लामपूर यांच्या ‘ज्योती’ आणि न्यू आर्टस्‌, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर यांच्या ‘स्पंदन’ नियतकालिकांस उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रु. ३ हजार रोख व प्रमाणपत्र असे आहे. जाहीर झालेल्या पुरस्कार्थीचे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीने कडून अभिनंदन करण्यात आले आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft