ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा उत्साहात संपन्न...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि फेस्कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही चव्हाण सेंटर मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद मेळावाचे  आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये चार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला तसेच संवाद ज्येष्ठ नागरिक संघ या संघटनेचा सुध्दा सत्कार करण्यात आला. महिला ज्येष्ठ नागरिक श्रीमती उषा शंकरराव जाधव (चुन्नाभट्टी), डॉ. रेखा भातखंडे (माहिम), पुरूष ज्येष्ठ नागरिक श्री. वसंत मोरेश्र्वर टिल्लू (सायन), श्री. अनंत कृष्णा पाटिल (चुन्नाभट्टी) या चार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार प्रमुख पाहूणे आहारतज्ज्ञ श्रीमती रेखा दिवेकर व प्रतिष्ठानचे सरचिटणीस व निवड समितीचे अध्यक्ष मा. श्री. शरद काळे यांच्य हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
 
कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे स्वागत संजय बनसोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना पवार यांनी केले. आलेल्या मान्यवरांचा परिचय संगीता गवारे, सुषमा साळुंखे आणि शोभा लोंढे यांनी करून दिला. त्यानंतर सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. रेखा दिवेकर यांनी उतरत्या वयात शरीराला योग्य आहार घ्यावा. तसेच जे आपण खातो त्यामुळे आपलं शरीर चांगले राहते. भूक कधीही मारू नये, शीळ आणि थंड अन्न खाऊ नये असे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 
पुढच्या वर्षी जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा येऊ तेव्हा आपण पहिल्यादा थोडासा व्यायाम करून कार्यक्रमाला सुरुवात करू. आणि विविध उदाहरणे देऊन शरद काळे यांनी मार्गदर्शन केले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft