ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा २०१६ संपन्न..

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबई यांच्यातर्फे दरवर्षी ऑक्टोबरमध्ये एक विशिष्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या व फेस्कॉमच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळाव्याचे आयोजित केला जातो. त्या मेळाव्यामध्ये दोन पुरुष व दोन महिनला ज्येष्ठ नागरिकांना सत्कार करण्यात येतो. यावर्षी रविवार दि. १६ ऑक्टोबर २०१६ रोजी चव्हाण केंद्रामध्ये ब्रांदा ते दहिसर या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनांचा मेळावा भरविण्यात आला. मेळाव्याचे अध्यक्ष श्री. शरद काळे हे होते व प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक मा. डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. अंदाजे ४०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात उपस्थित होते.

सत्कारासाठी महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी आपले अर्ज पाठविले होते. सरचिटणीस श्री शरद काळे व विश्वस्त श्री. बी. के. अग्रवाल यांच्या समितीने सत्कारासाठी महिला ज्येष्ठ नागरिक म्हणून श्रीमती हिरा दया पवार व सौ. वर्षा मधुकर रेगे नागरिक व पुरुष ज्येष्ठ नागरिक म्हणून श्री. पांडुरंग विठ्ठल म्हापसेकर व श्री. मनोहर विनायक जोगळेकर तसेच ज्येष्ठ नागरिक संघटना म्हणून ज्येष्ठ नागरिक संघ बेस्ट नगर ह्या सर्वांचा समारंभामध्ये सत्कार करण्यात आला.


   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft