आज बारामती येथे लघुपट निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न !यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान व व्ही.आय.आय.टी, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने फिल्मिन्गो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात नऊ ठिकाणी लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यापैकी कार्यशाळा आज ७ ऑक्टोबर २०१७ रोजी व्ही.आय.आय. टी महाविद्यालयात, बारामती येथे आयोजन करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन व्ही.आय.आय.टी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अमोल गोजे यांनी केले. यावेळी १०५ कलाकार व विद्यार्थी सहभागी नोंदविला होता. अशोक राणे आणि महेंद्र तेरेदेसाई यांनी उपस्थित राहिलेल्या कलाकार व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.

दिवंगत अरूण साधू यांना प्रतिष्ठानतर्फे आदरांजली‘ग्रंथाली’ व यशवंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’ सभागृहात दिवंगत अरुण साधू यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘जना-मनातले साधू’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या लेखणीने समाजातील उपेक्षित घटकांची वास्तवस्थिती साहित्यातून मांडणारे चतुरस्त्र प्रतिभेचे लेखक-पत्रकार अरुण साधू यांनी मराठी माणसांच्या मनात विशिष्ट स्थान निर्माण केले, अशी भावना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft