यंदाचा राज्यस्तरीय पारितोषिक श्री. भुजंगराव कुलकर्णी यांना जाहीर..

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी औद्योगिक समाजरचना/व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता/ विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास/ अर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती/ कला क्रिडा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील व्यक्तीस/ संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम. रु. २,००,०००/- व मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे.

वरील क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करणा-या व्यक्ती अगर संस्था यांच्या विषयी प्राप्त झालेल्या शिफारसींचा विचार करुन पारितोषिक निवड समितीने ज्येष्ठ, कार्यक्षम, चारित्र्यसंपन्न व यशस्वी सनदी अधिकारी ( भारतीय प्रशासन सेवा) मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांची या वर्षीच्या पारितोषिकासाठी निवड केलेली आहे. मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांनी त्यांच्या सेवा काळात भूमी सुधारणा (कूळ कायदा) ची जनगणना, पुणे महानगरपालिका, नागरी विकास व आरोग्य, जलसंपदा, न्हावाशेवा बंदराची संरचना, मराठवाडा विकास योजना, मराठवाडा वैधानिक मंडळ, मागासलेल्या भागाचे सबलीकरण यांसारख्या अनेक शासकीय कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.

या क्षेत्रांतील त्यांचे असाधारण कर्तृत्व लक्षात घेऊन हे पारितोषिक मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चव्हाण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा उत्साहात संपन्न...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि फेस्कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही चव्हाण सेंटर मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद मेळावाचे  आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये चार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला तसेच संवाद ज्येष्ठ नागरिक संघ या संघटनेचा सुध्दा सत्कार करण्यात आला. महिला ज्येष्ठ नागरिक श्रीमती उषा शंकरराव जाधव (चुन्नाभट्टी), डॉ. रेखा भातखंडे (माहिम), पुरूष ज्येष्ठ नागरिक श्री. वसंत मोरेश्र्वर टिल्लू (सायन), श्री. अनंत कृष्णा पाटिल (चुन्नाभट्टी) या चार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार प्रमुख पाहूणे आहारतज्ज्ञ श्रीमती रेखा दिवेकर व प्रतिष्ठानचे सरचिटणीस व निवड समितीचे अध्यक्ष मा. श्री. शरद काळे यांच्य हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
 
कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे स्वागत संजय बनसोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना पवार यांनी केले. आलेल्या मान्यवरांचा परिचय संगीता गवारे, सुषमा साळुंखे आणि शोभा लोंढे यांनी करून दिला. त्यानंतर सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. रेखा दिवेकर यांनी उतरत्या वयात शरीराला योग्य आहार घ्यावा. तसेच जे आपण खातो त्यामुळे आपलं शरीर चांगले राहते. भूक कधीही मारू नये, शीळ आणि थंड अन्न खाऊ नये असे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 
पुढच्या वर्षी जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा येऊ तेव्हा आपण पहिल्यादा थोडासा व्यायाम करून कार्यक्रमाला सुरुवात करू. आणि विविध उदाहरणे देऊन शरद काळे यांनी मार्गदर्शन केले.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft