विज्ञानगंगाचे अकरावे पुष्प संपन्न..
सुगंधी फुले नष्ठ का झाली- नागेश टेकाळे


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञानगंगाचे अकरावे पुष्प 'हल्लीच्या फुलांना वास का येत नाही' नुकताच पार पडला. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वनस्पती शास्त्र प्रा. नागेश टाकसाळे यांनी जागतिक दर्जाविषयी उत्कृष्ट उदाहरण देऊन उपस्थितांचे मन जिंकले. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट सुवासाशी कशी निगडित आहे याची सुध्दा उदाहरण दिले.

सुरुवातीला टेकाळे सरानी पर्यावरण व्याख्या स्पष्ट केली ती अशी "जैविक आणि अजैविक घटकांचा एकमेकास पूरक असा एकत्रित मिलाप, याला संतुलित पर्यावरण असेही म्हणतात." त्यानंतर सुंदर फुलांचे आकर्षण दोन प्रकारचे असते, एक रंग आणि दूसरा सुवास. याच्यामधील फरक सुध्दा त्यांनी समजावून दिला. रंगाचे सौंदर्य दुरुन न्याहाळता येते, पण त्याचा मात्र सुवास आपल्या जवळ खेचून आणतो हे वि न आहे असेही त्यांनी सांगितले. सुवास अथवा ग्रंथ निर्मिती करणारी उदाहरणे यामध्ये फूल-देशी, गुलाब, सोनचाफा, फळ-पिकलेला आंबा, बी-जीरे, पाने-तुळस, कढिपत्ता गवती चहा, तसेच सर्वात जास्त सुगंध हा तुलसीपासून मिळतो अशी माहिती त्यांनी दिली.

शाळेतील उदाहरण देता सरानी शाळेत केलेला प्रयोग, एका वर्गात गणित अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्याना तुलसीच्या झाडाच्या बाजूला बसून अभ्यास करावयास सांगितले, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रगती झाल्याचे आढळले. सुगंधी फुलाचे फायदे बरेचशे रोग नाहीसे होतात, रोजजंतु नष्ठ होतात आणि प्रतिकार शक्ति वाढवतात. तसेच त्यांनी सुगंध हरवलेली फुले यांची माहिती दिली सुलतान चंपा, ऑर्किड, पाटल, अतसी, जपाकुसुम, बंधूक, कंदाचे फूल, लाल कमळ, श्वेत कमळ, कड़क चंपा, बकुळ, माधवी आणि माधवी लत्ता व केवढा सुगंध हरवतोय कारण जंगल तोड़, रसायनांचा वापर, वातावरणातील बदल हे प्रमुख कारण आहे असे त्यांनी नमूद केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे
सुवर्णगाथा ५० राज्यस्तरीय निबंध व वकृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण संपन्न..राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या संसदीय कारकीर्दीस येत्या 22 फेब्रुवारी रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे पारितोषिक मा. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वस्त हेंमत टकले तसेच युवा महाराष्ट्र अभियानचे निलेश राऊत व दत्ता बाळसराफ उपस्थित होते.

महाविद्यालयीन वक्तृत्व व शालेय निबंध स्पर्धाचा निकाल खालील प्रमाणे..

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft