'विज्ञानगंगा'चे विसावे पुष्प संपन्न...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत विसावे पुष्प, व्याख्याते डॉ. सोमक रॉय चौधरी यांचे 'विश्वातील सर्वात मोठी आकाशगंगा' या विषयावर चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विशेषम्हणजे नेमकी म्हणजे आकाशगंगा हे समजून घेण्यासाठी अधिक विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

सुरुवातीला चौधरी यांनी 'विश्वातील सर्वात मोठी आकाशगंगा' म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगितलं. त्यानंतर त्यानी आकाश संदर्भात संशोधन करत असताना त्यांना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले.

आकाशात काही ग्रह कधी कधी उलटे फिरताना दिसतात. वास्तविक सर्वच ग्रह सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुध्द दिशेने फिरतात. पण पृथ्वीवरून पाहताना काही ग्रह मधेच उलटे जाताना दिसतात. असं का होतं हेही त्यांनी उदाहरणं देऊन स्पष्ट केलं.

चंद्रकक्षेपलीकडील, सूर्यमालेतील पोकळी म्हणजे चंद्रकक्षेपासून आपल्या सूर्यमालेच्या शेवटच्या ग्रहाच्या कक्षेपर्यंतच्या पोकळीस अंतरिक्ष म्हणू या. सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा केन्द्र आहे, म्हणून त्याच्या पृष्ठभागापासून ते सूर्यमालेच्या परीघापर्यंत अंतरिक्षाची मर्यादा होते. शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून वगैरे ग्रहांचे, ज्या यानांतून वेध घेतले गेले ती अंतरिक्ष याने, अंतराळ याने नव्हेत. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह आणि त्यांचे अुपग्रह, प्लुटोसारखे बटुग्रह, लघुग्रहांचा पट्टा आणि त्यातील लघुग्रह, अशनी वगैरे वस्तू अंतरिक्षात भ्रमण करतात. पृथ्वीही अंतरिक्षातच भ्रमण करते. असंही सोमक यांनी सांगितलं.

सिंहासन सिनेमा व चर्चा...ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधूंचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या 'सिंहासन' व 'मुंबई दिनांक' या कादंबरी व कथासंग्रहातील निवडक प्रसंगांवर आधारित सिनेमा बनला-"सिंहासन". आपल्या सर्वांचा परिचित चित्रपट. १९७९ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला... संपूर्णपणे राजकारणच केंद्रबिंदू असलेला हा मराठीतील पहिला चित्रपट...सत्तेच्या सिंहासनासाठी केल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारित हा सिनेमा आहे..राजकीय डाव, बेरीज-वजाबाकी आणि अनुत्तरित गणितंही...हे राजकारण अनेकदा सामान्य माणसांच्या आकलनापलीकडचे असते...पण एक पत्रकार म्हणून खुर्चीभोवतालचे हे डाव टिपता येतात...याचचं यथार्थ चित्रण या सिनेमात आहे.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft