सिंहासन सिनेमावर चर्चाज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधूंचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या 'सिंहासन' व 'मुंबई दिनांक' या कादंबरी व कथासंग्रहातील निवडक प्रसंगांवर आधारित सिनेमा बनला-"सिंहासन". आपल्या सर्वांचा परिचित चित्रपट. १९७९ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला... संपूर्णपणे राजकारणच केंद्रबिंदू असलेला हा मराठीतील पहिला चित्रपट...सत्तेच्या सिंहासनासाठी केल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारित हा सिनेमा आहे..हा सिनेमा नूकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये दाखविण्यात आला.

हा सिनेमा संपल्यानंतर समिक्षक व दिगदर्शक अशोक राणे यांनी १९७५ च्या काळातील काही चित्रपट आणि वास्तव यातील काही गोष्टी सांगितल्या. तसेच आता तसे चित्रपट का बनू शकत नाही ? या विचारलेल्या प्रश्नाला सुध्दा त्यांनी सुंदर दिलेलं उत्तर त्या काळात जब्बार पटेल यांना राजकीय विषयावर चित्रपट तयार करावा असं वाटलं होतं. आत्ताच्या तरूणाला वाटतं नाही. ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी १९७५ च्या काळातील राजकारण आणि संघटना याबाबतच्या घटना सांगून आठवणींना उजाळा दिला.

'विज्ञानगंगा'चे एकविसावे पुष्प...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत एकविसावे पुष्प, संगणकतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांचे 'इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी काल-आज-उद्या' या विषयावर शुक्रवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ येथे गुंफणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft