शेती सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर



शेतीतील सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात अन्य राज्याच्या तुलनेत विविध निकषांवर 81 टक्के गुण मिळवून आघाडीवर आहे, असे प्रशस्तीपत्र खुद्द निती आयोगाने दिले आहे. भारतीय लोकप्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान - २०१७’ मध्ये ‘व्हिजन ऑफ निती आयोग फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ या विषयावर निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त तथा भारतीय लोकप्रशासन संस्थेचे महाराष्ट्र शाखेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव एस.जी.काळे आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज बाम स्मृतीसभा...

ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ आणि निवृत्त विशेष पोलिस महानिरिक्षक भीष्मराज पुरुषोत्तम बाम यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी नूकतेच नाशिक येथे हदय विकाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता प्रतिष्ठानच्या जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग येथील रंगस्वर सभागृहात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरदरावजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, क्रिडा पत्रकार विजय साळवी, संचालक नेहरु सेंटर सतिश सहानी आणि नेमबाज अंजली भागवत व सुमा शिरुर या उपस्थित राहणार आहेत.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft