'डिजीटल क्लासरूम'चे मा. श्री. शरद पवारांच्या हस्ते उद्धाटन

स्व. मा. यशवंतरावजी चव्हाणसाहेब आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व धुरंधर राष्ट्रीय नेते यांच्या नावे प्रत्येक वर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईतर्फे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. २०१५ साली मा. डॉ. विजय केळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. केळकर यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून टिळक हायस्कूल कराड येथे डिजीटल क्लासरूम तयार करण्यात आल्या आहेत. त्याचा उद्धाटन समारंभ मंगळवारी २० जून रोजी सकाळी ११.३० वाजता मा. श्री. शरद पवार, अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या हस्ते स्व. यशवंतराव स्मृतिसदन (टाऊन हॉल) कराड येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांना अभिष्टचिंतन..

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांना वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले त्यावेळी आस्थापना व्यवस्थापक संजय बनसोडे, कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ व वित्त व लेखा व्यवस्थापक महेश चव्हाण यावेळी उपस्थित होते.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft