तृतीयपंथीयांच्या जाणीव जागृतीचा कार्यक्रम कुलाबा पोलिस ठाण्यात

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विकास अध्ययन केंद्रातर्फे तृतीयपंथी आणि त्यांचे हक्क याबाबत जाणीव जागृती प्रशिक्षण शिबीरं आणि विविध शासकीय यंत्रणांसोबत ४ मे २०१८ रोजी सकाळी ९ वाजता कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये कार्यक्रम आयोजीत केला आहे. पहिला टप्पा म्हणजे शालेय शिक्षकांसोबत आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक शिक्षकांना तृतीयपंथी आणि त्यांचे हक्क जाणीव जागृती शिबिर मार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या प्रशिक्षणातून अनेक लोकांना तृतीयपंथीयांबद्दल असलेले गैरसमज दूर होण्यास मदत झाली आहे. विविध संस्था, संघटने मध्ये सुध्दा हे प्रशिक्षण दिले आहे. यासोबतच ही कार्यशाळा पोलिस प्रशासनासमोर होणार आहे.

'विज्ञानगंगा'चे पंचविसावे पुष्प...'पुरातन खगोलशास्त्र'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत पंचविसावे पुष्प शास्त्रज्ञ डॉ. मयांक वाहिया यांचे 'पुरातन खगोलशास्त्र' या विषयावर यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आयोजीत करण्यात आले होते.

इतिहासामध्ये पृथ्वीसारखे ग्रह अनेक निर्माण झाले असल्याच्या शक्‍यता वाहिया सांगितली, तर ग्रहांवर पुरातन जीवव्यवस्था असण्याची शक्‍यता आहे असेही ते म्हणाले. ही सूर्यमालिका पृथ्वीपासून ११७ प्रकाशवर्षे दूर आहे. या सूर्यमालिकेमधील पाचही ग्रहांचे क्षेत्रफळ पृथ्वीपेक्षा कमी आहे. या सूर्यमालिकेमधील सर्व ग्रह दहा दिवसांपेक्षाही कमी दिवसांत केपलर ४४४ ताऱ्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करतात.

सूर्य, पृथ्वी, तारे, सूर्यमाला, ग्रह, मानवी उपग्रह यांसारख्या अवकाशातील विविध गोष्टींचा मेळ याबाबत सुध्दा वाहिया यांनी मार्गदर्शन केले.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft