चित्रपट चावडीतर्फे 'द लॉन्ग वॉक टू फ्रिड्म' चित्रपट दाखवणार...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत 'द लॉन्ग वॉक टू फ्रिड्म' हा चित्रपट शुक्रवारी १० ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता चव्हाण सेंटर मध्ये दाखविण्यात येणार आहे.

१८ जुलै १९१८ला जन्मलेल्या मंडेलांनी साम्राज्यवाद, गरिबी आणि वंशभेदाचं उच्चाटन करण्यासाठी जो अतूलनीय लढा दिला त्याचं खरंतर शब्दांत वर्णन करणं शक्य नाही. द 'लॉन्ग वॉक टू फ्रिड्म' हा त्याच्या आयुष्यावरील चित्रपट असून त्यामध्ये व्यक्तीगत आयुष्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा आणि जागतिक पातळीवरील अनेक लढ्यांचा पट यामध्ये पहायला मिळतो. मंडेला १९९४ ते १९९९ या काळात दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष होते. वर्षानुवर्ष 'काळे' म्हणून हिनवल्या गेलेल्या समूहातील ते पहिले राष्ट्राध्यक्ष. शांततेचं नोबेलही त्यांनी प्रदान करण्यात आले होते. अशा ब-याचशा घटना प्रेरणा देणा-या आहेत. प्रेरणा देणारी ही फिल्म सुमारे दोन तास कालावधीची आहे. ही फिल्म सर्वांसाठी विनामूल्य असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

विज्ञानगंगाचे एकोणतीसावे पुष्प...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत एकोणतीसावे पुष्प टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथील शास्त्रज्ञ प्रा. विदिता वैद्य यांचे 'द इमोशनल ब्रेन' या विषयावरील व्याख्यान शुक्रवार दि १७ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ५. वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft