crear sitio web con WordPress

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम संपन्न...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, सलाम मुंबई फाऊंडेशन आणि नरोत्तम सक्सेरिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या कार्यध्यक्ष मा. खा. सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शाळकरी मुलांच्या गाण्यानं झाली, त्यानंतर तंबाखू विरोधात जनजागृती करणा-या संस्था, प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सत्कार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
हेमंत टकले यांनी तंबाखू सोडून एकवर्षं झाल्याचं बोलताना कबूल केलं. तसेच तंबाखूचं व्यसन जडल्यानंतर काय अवस्था होती, आणि तंबाखू सोडल्यानंतरचा अनुभव थोडक्यात लोकांना सांगितला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संस्था, कार्यकर्ते आणि शिक्षकांचं अभिनंदन केलं. प्रतिष्ठान आणि इतर संस्थांचे काम कशा पद्धतीने सुरू आहे हेही आवर्जून सांगितले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft