तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, सलाम मुंबई फाऊंडेशन आणि नरोत्तम सक्सेरिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या कार्यध्यक्ष मा. खा. सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी तंबाखू विरोधात जनजागृती करणा-या संस्था, प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सत्कार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी २९ जूनला सकाळी ११ वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल. आयोजीत संस्थांकडून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft