एकदिवसीय चित्रपट रसग्रहण शिबीर

जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नांदी म्हणून यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पु. ल. अकादमीच्या सहयोगाने २ जानेवारी, २०१८ला रवींद्र मिनी थियेटरमध्ये एकदिवसीय चित्रपट रसग्रहण शिबिराचे आयोजन करीत आहे. विनामुल्य असलेल्या ह्या शिबिरात प्रसिद्ध नाट्य/चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व प्रसिद्ध व लोकप्रिय चित्रपट शिक्षण तज्ञ श्री. समर नखाते ह्याचं मार्गदर्शन मिळणार आहे. मर्यादित जागा असल्याने, yiffonline.com ह्या वेबसाईटवर अथवा पुढील लिंकवर क्लिक करा.. https://goo.gl/KxoTkU  तुम्हाला पूर्व नोंदणी करुन ह्या शिबिराला येता येईल. उत्तम व नविनत्तम जागतिक, एशियन व भारतीय सिनेमांचा आस्वाद घेण्यासाठी १९ ते २५ जानेवारी, २०१८ ला होणाऱ्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नोंदणीही तुम्हाला ह्याच वेबसाईटवर किंवा ह्या शिबिराच्या जागी प्रत्यक्षात करता येईल. 

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft