फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव – २०१७ संपन्न...“प्रयोग मालाड” आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ चित्रपट अभ्यासक व समीक्षक श्री. अशोक राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजीत “फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०१७” दिनांक डिसेंबर २२ ते २४, २०१७ या दरम्यान  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र, मुंबई येथे संपन्न झाला. महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यास सुप्रसिद्ध अभिनेते श्री. संदीप कुलकर्णी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते फिल्मिन्गो २०१७ च्या कॅटलॉगचे प्रकाशन करण्यात आले. श्री. अशोक राणे यांनी उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक केले.
या महोत्सवात एकूण १६० लघुचित्रपट सामील झाले होते. त्यामध्ये भारतासमवेत इंग्लंड, अमेरिका, इटली, यु.ए.ई., ऑस्ट्रिया, कॅनडा, आणि श्रीलंका येथील स्पर्धकांचा समावेश आहे. फिल्मिन्गो महोत्सवातून मागील वर्षी Cannes Short Film Corner ला निवड झालेले लघुपट, त्याचप्रमाणे स्पंदन परिवार व Whistling Woods International मधील पारितोषिकप्राप्त लघुपट या फिल्मिंगो महोत्सवामध्ये दाखविण्यात आले.   श्री. रघुवीर कुल, श्रीमती रेखा देशपांडे, श्री. अनंत अमेंबल, श्री. अरुण गोंगाडे, आणि श्री अवधूत परळकर या मान्यवरांनी अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. 

दिनांक २३ डिसेंबर २०१७ – महोत्सवाच्या दुस-या दिवशी श्री. अमरजित आमले आणि श्री. विजय कळमकर यांचा मास्टर क्लास महोत्सवाचे अजून एक विशेष आकर्षण ठरले.  उपस्थित प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना चित्रपट निर्मिती विषयीची आस्था आणि निष्ठांवर अधिक भर देऊन निर्मिती प्रक्रियेसंबंधीचे विविध कंगोरे त्यांनी उलगडून दाखविले. १७२ प्रशिक्षणार्थींनी मास्टर क्लासचा लाभ घेतला.

दिनांक २४ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या सांगता समारंभातील पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द निर्माते आणि दिग्दर्शक श्री. एन. चंद्रा आणि विशेष अतिथी म्हणून प्रभात चित्र मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. किरण शांताराम, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे श्री. दत्ता बाळसराफ आणि नवमहाराष्ट्र युवा अभियानचे श्री. निलेश राऊत मंचावर उपस्थित होते.

या महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरणारे पहिले पाच लघुपट, प्रतिष्ठित कान्स फेस्टिवल – २०१८, फ्रान्स येथे पाठविण्याची जबाबदारी “प्रयोग मालाड” ही संस्था स्वीकारणार आहे असे यावेळी जाहीर करण्यात आले. अर्पिता वोरा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत आकर्षक आणि नीटनेटके केले.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft