'फिल्मिन्गो'आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा सुरुवात...प्रयोग मालाड संस्था आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फिल्मिन्गो ‘आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव -२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात उत्साहात पार पडला. यावर्षीच्या फिल्मिन्गो फेस्टिवल - २०१७ साठी एकूण १५९ पेक्षा अधिक शॉर्टफिल्म्स आलेल्या असून त्यामध्ये विदेशी स्पर्धकांचा समावेश असल्याची माहिती अशोक राणे यांनी दिली. उद्घाटन झाल्यानंतर जमलेल्या प्रेक्षकांना तीन शॉर्टफिल्म दाखवण्यात आल्या.

या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा प्रमुख पाहूणे अभिनेते संदीप कुलकर्णी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ग्रंथपाल प्रमुख अनिल पाझरे आणि अशोक राणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी उपस्थित प्रेक्षकांना थोडक्यात मार्गदर्शन केले.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft