'विज्ञानगंगा' चे अठरावे पुष्प संपन्नयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत अठरावे पुष्प, आघारकार रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथील प्राध्यापक श्री. सुरेंद्र घासकडबी यांचे 'जेनेटिक्स' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अलीकडील काळात आपण नेहमी हा रोग अनुवांशिक आहे किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग, डीएनए टेस्ट असे उल्लेख ऐकतो. पण हे जेनेटिक्स म्हणजे नक्की काय, हे सुरेंद्र घासकडबी यांनी विविध उदाहरणातून समजावून सांगितले.

एखादी वैज्ञानिक संकल्पना सामान्यांपर्यंत पोहचवायची असेल, तर क्लिष्ट भाषा टाळावी लागते.घासकडबी यांनी उपस्थितांना समजेल, अशा सुलभ भाषेत उदाहरणे देऊन जेनेटिक्स या विषयावर चित्रे दाखवून चर्चा केली. विचारलेल्या मूलभूत शंकाचे निरसन ही त्यांनी केले.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft