विद्यार्थी आरोग्य शीबीर


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, न्यू होरायाझान्सा, हेल्थ एन्ड रिसर्च फाउंडेशन, आणि इंडियन अॅकॅडमी पेडीयेट्रिक्स, यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थंचे, वाघे माध्यमिक शाळा येथे विद्यार्थी आरोग्य शिबीर संपन्न...

उषादेवी पांडुरंग वाघे माध्यमिक शाळा, कुलाबा येथे रविवारी दि. ३० जुलै २०१७ विद्यार्थी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात एकूण २५२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, मुलांची वय व त्यानुसार त्यांची उंची आणि वजन, श्वासंक्रीयेचा वेग, त्वचेचे आजार, पचन संस्थेशी सबंधित तक्रारी, विटामिन, कॅल्सिअम, बि-१२ अश्या प्रकारच्या तपासणी करण्यात आल्या. या तपासणी मध्ये अंदाजे २९ विद्यार्थ्यांना चष्मा , ११ विद्यार्थ्यांना दातासंबधी तक्रार, १३ विद्यार्थ्यांना अॅनिमिया ह्या तक्रारी असल्याचे आढळले. यावर त्यांना आवश्यक ती औषधे देण्यात आली. तसेच तपासणी दरम्यान मुलांशी संवाद साधतांना डॉक्टरांनी त्यांच्या अभ्यासात येणा-या अडचणी शोधून काढल्या व किती विद्यार्थ्यांना हा त्रास आहे हे संबंधीत शिक्षकांना समजावून सांगितले.

या शिबिरात पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.. या शिबिराच्या उद्घाटनावेळी डॉ. समीर दलवाई (बालरोग तज्ञ) आणि त्यांच्या डॉक्टरांच्या समूहाने सर्व तपासण्या केल्या. सुरुवातीला विद्यार्थी आणि पालक यांना एकत्र बसवून डॉ. दलवाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या दिनचर्येबद्दल चर्चा केली. मुले सकाळी न्याहारी करत नाही व त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम कसा व काय होतो, तसेच बाहेरचं अन्न खाल्यामुळे होणारे दुष्परिणाम, तर योग्य वेळी पौष्टिक खाणे व शरीरास आराम, म्हणजे हवी तशी झोप ह्याचे नियोजन कसे करावे हे अगदी हसत्या खेळत्या वातावरणातून डॉ. समीर दलवाई यांनी मुलांना समजावून सांगितले. तसेच ह्या छोट्याश्या चर्चेतून पालकांना सुद्धा कानमंत्र मिळाला. तसेच मुलांनी सकाळी शाळेत जाण्याअगोदर कमीतकमी १ तास आधी उठणे गरजेचे आहे. म्हणजे मुले सकाळी न्याहारी स्वतः हून मागतात. परंतु जे खातील ते पौष्टिक असावे याची काळजी घ्यावी. अभ्यासाची वेळ सुद्धा मुलांना ठरवून दिली कि त्यांना त्यांच्या खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

डॉ. समीर दलवाई व डॉ. दीप्ती मोडक व इतर डॉक्टरांच्या समूहानी हे आरोग्य शिबीर यशस्वीपणे पार पाडले. या शिबिराला शाळेचे प्राध्यापक श्री. सुरेश धनावडे, वाघे हायस्कूल चे सर्व शिक्षक व प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री. दत्ता बाळसराफ आणि वित्त व लेखा व्यवस्थापक श्री. महेश चव्हाण यांची उपस्थिती होती.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft