यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये योगा क्लासेस

नवीन वर्षाच्या सुरूवातीला प्रत्येकजण काहीतरी नवीन संकल्प करत असतो. त्याच अनुशंगाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने संकल्पकर्त्यांसाठी योगा क्लासेस सुरू करण्यात आले आहे. सध्या योगा क्लासेस प्रतिष्ठानमध्ये बुधवार आणि शुक्रवार सकाळी ७ ते ८ या वेळेत नियमित सुरू आहेत. दुसरी बॅच लवकरचं सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या जीमेल आयडीवर किंवा ८८७९७८४८४७ मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा. सहभागी होणा-या प्रशिक्षणार्थीला पार्किंगची व्यवस्था प्रतिष्ठानतर्फे उपलब्धतेनूसार देण्यात येईल. प्रशिक्षणार्थीकडून २२०० रूपये आणि जीएसटी असं शुल्क आकारलं जाईल.

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ एकदिवसीय कार्यशाळा संपन्नयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि विकास अध्ययन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. ही चर्चा प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, सलमा गुरू, गौरी सावंत, अभिना आहेर, जैनब पटेल, राजेंद्र कांविनडे आणि फिरोज अश्रफ इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका कड यांनी केले तर तृतीयपंथी आणि त्यांच्यासमस्या याविषयी अभिना आहेर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तृतीयपंथी यांनी सांगितलेल्या कौटुंबिक , शैक्षणिक आणि आर्थिक समस्यांना सुप्रिया सुळे यांनी योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रिया पाटील आणि माधुरी सरोदे यांनी केले.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft