कायदेशीर साक्षरता कार्यशाळा संपन्नयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि ओरिएंटल कॉलेज ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर आणि लॉ च्या विद्यार्थ्यांसाठी नूकतीच कायदेशीर साक्षरता या विषयावर नवीमुंबई सानपाडा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अधिक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभागी झाले. मान्यवरांनी त्यांना योग्य असे मार्गदर्शन केले.

विधी साक्षरता कार्यशाळेत तरूणांचा सहभाग


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम व स्वयंम फाउडेशन संस्था पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी महिन्यामध्ये वसई फाटा, दहिसर गाव, माध्यमिक शाळा, जिल्हा व तालूका पालघर येथे एक दिवसीय विधी साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ९० युवक व युवती कार्यक्रमाला हजर होत्या. त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत कायद्याची माहिती करून देण्यात आली. तसेच व्याख्यानाचे माध्यम मराठी असल्यामुळे उपस्थित वर्ग आनंदीत होता.

सुरूवातीला कार्यक्रमामध्ये महिलांना उपदेश देण्यात आला. हुंडाबंदी कायद्याचे पालन करा, अन्याय सहन करू नका, तूमच्या अधिकारांची जाणीव करून घ्या, संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत येणा-या जगणाच्या अधिकाराची माहिती करून घ्या, कायदा पाळा, मोफत सहाय्य सल्ला फोरमचा उपयोग करून घ्या, सुजान नागरिक व्हा. सक्षम बनण्याचा प्रयत्न करावा.

पहिल्या सत्रामध्ये-
कौटुंबिक अत्याचारापासून महिलांचे संरक्षण कायदा या विषयावर हेमंत केंजाळकर यांनी व्याख्यान दिले. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळापासून सरंक्षण या विषयावर अजय केतकर यांनी व्याख्यान दिले. पोलिस स्टेशनचे कामकाज व फौजदारी प्रक्रिया संहिता या विषयावर निलेश पावस्कर यांनी माहिती दिली. सायबर कायदा या विषयावर गितांजली शिंदे यांनी माहिती दिली. माहितीचा अधिकार या विषयी भूपेश सांमत यांनी मार्गदर्शन केले.

दुस-या सत्रामध्ये-
“इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना !” या अभियान गिताने आणि संविधानातील मुलभूत कर्तव्याचे पालन संबंधी शपथ घेऊन दुस-या सत्राला सुरूवात केली. व्याख्यानानंतर काही अचूक प्रश्नांना चांगली उत्तरे देण्यात आली. झालेल्या कार्यक्रमाबाबत तरूणांनी चांगली प्रतिक्रिया दिली.

   

विधी सल्लागार व सदस्य सचिव  

श्री. म. बा. पवार
विधी सल्लागार व सदस्य सचिव,
कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०२८५९८ / ०२२-२२८५२०८१


   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft