आत्ममग्नता (ऑटिझम) जाणीव जागृती कार्यशाळा ...



सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभाग, पुणे, परिवार, फोरम फॉर ऑटिझम, सोपान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २३ जून २०१७ रोजी आत्ममग्नता (ऑटिझम) जाणीव जागृती कार्यशाळेचे मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण केंद्र, नरीमन पॉईंट, मुंबई येथे आयोजन केले आहे.

ही एकदिवसीय कार्यशाळा ऑटिझम या अपंगत्वाबद्दल जनजागृती आणि शैक्षणिक आणि सामाजिक समावेशकता या विषयाला अनूसरून या प्रवर्गासाठी आयोजन केले आहे. ऑटिझम हा एक जटील विषय असून व्यक्तीचा संवाद आणि सामाजिक समज याच्यावर परिणाम करणारी ही बाब आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन मा. मंत्री राजकुमारजी बडोले (मंत्री सामाजीक न्याय व विशेष सहाय्य) करणार असून मा.ना. दिलीप कांबळे (राज्यमंत्री सामाजिक न्याय), मा. खा. सुप्रिया सुळे, मा. नंदकुमार (शिक्षण सचिव) मा.दिनेश वाघमारे (सचिव सामाजिक न्याय), मा. नितीन पाटील (आयुक्त, अपंग कल्याण) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदरील कार्यशाळांची संकल्पना श्री. नितीन पाटील (आयुक्त अपंग कल्याण) यांची असून मा. यशवंत मोरे (प्रादेशिक उपायुक्त, मुंबई) परिवाराचे कमांडर, बिजूर, फोरम फॉर ऑटिझमच्या बबीता राजा, सोपानच्या डॉ. रुबिना लाल व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय कान्हेकर यांची असून कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft