श्रवणयंत्र,पूर्वतपासणी शिबीर"श्रवणयंत्र, मोफत वाटप कार्यक्रमाची पूर्वतपासणी शुक्रवार दि.२१ सप्टेंबर २०१८ रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस भवन, कसबा-बारामती या ठिकाणी करण्यात आली. मा.श्री.अजितदादा पवार (मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व मा. सौ. सुप्रियाताई सुळे (खासदार,बारामती लोकसभा मतदार संघ) यांचे संकल्पनेतून आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्डचॅरिटेबल फाउंडेशन, नरोत्तम सक्सेरीया फाउंडेशन मुंबई, ठाकरसी ग्रुप मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप पूर्वतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक व लहान मुले अशा लाभार्थींची तपासणी करण्यात आली.

तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, अपंग पुनर्वसन केंद्र, राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी संचलित, जयंत दारिद्रय निर्मूलन अभियान आणि स्टार्की फौंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने १० वर्षाखालील कर्णबधिर मुलांना मोफत श्रवणयंत्र वाटप पुर्व नावनोंदणी आणि मोजमाप शिबिर दि. २७ सप्टेंबर २०१८ रोजी राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी इस्लामपूर येथे सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये २०३ मुलांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मा. प्रा. शामराव पाटील अध्यक्ष राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी, श्री संजय पाटील अध्यक्ष वाळवा तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पार्टी, श्री. सचिन पाटील, श्री. डुबल सर समाजकल्याण प्रतिनिधी श्री. इलियास पिरजादे समन्वयक जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान व सर्व स्टाफ उपस्थित होते.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft