दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी जनजागृती कार्यशाळासामाजिक न्याय एवम अधिकारिता मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नॅशनल ट्रस्ट नवी दिल्ली, जय वकील फौंडेशन, मुंबई (स्टेट नोडल एजन्सी ) समाज कल्याण विभाग मुंबई शहर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, महात्मा गांधी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि फेलोशिप ऑफ फिजिकली हँडीकॅप, हाजीअली, मुंबई यांच्या सहकार्याने नॅशनल ट्रस्ट अंतर्भूत मतिमंद, स्वमग्न, सिरेबल पाल्सी, बहु विकलांग या दिव्यांगांच्या पालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन गरवारे सभागृह, वरळी येथे करण्यात आले होते. यासाठी केंद्र शासनातर्फे मुकेश जैन, सहसचिव यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी जय वकील संस्थेच्या अर्चना चंद्रा , समाज कल्याण विभागाच्या श्रीमती मोरे, तसेच विलास कोरगावकर, विजय कान्हेकर, मा. श्री. बुरुडे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत नॅशनल ट्रस्टच्या एकूण १० योजनांची सविस्तर माहिती श्री. जैन यांनी पालकांना दिली. निरामय योजनेंतर्गत या मुलांचे विमा संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांनी दिशा, विकास, घरोंदा आदी योजनांच्या माध्यमातून या मुलांना व पालकांना आधार द्यावा असे मार्गदर्शन केले. तसेच एल.एल.सीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून महाराष्ट्रातील दिव्यांगांचे कायदेशीर पालकत्वाची प्रकरणे लवकर मार्गी लावावीत असे सुचविले. अर्चना चंद्रा , श्री. बुरडे, श्री. विजय कान्हेकर यांनी विविध विषयांवर उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषी मेहरा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राज्य समन्वयक दिपिका शेरखाने यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाकरीता त्यांना श्री. संख्ये, सुकेशिनी मर्चंडे, रमेश मोरे, फेलोशिप ऑफ फिजिकली हँडीकॅप या संस्थेच्या कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft