यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये
"वर्ल्ड डाऊन सिंन्ड्रोम डे " निमित्त कार्यशाळा संपन्न

"वर्ल्ड डाऊन सिंन्ड्रोम डे "चे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच आणि पॅरेंन्टस् ऑफ डाऊन सिंड्रोम असोसिएशन मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दि. २१ मार्च २०१७ रोजी यशवंतराव चव्हाण केंद्राच्या चौथ्या मजल्यावरील सांस्कृतिक सभागृहामध्ये मुलांच्या पालकांसाठी प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेल्या कार्यक्रमास प्रथम प्रार्थना नृत्याने डाऊन सिंड्रोम असलेल्या विशेष मुलांनी सुरेख सादरीकरण केले. या कार्यशाळेसाठी राज्याचे अपंग कल्याण विभागाचे आयुक्त मा. नितीन पाटील (भा.प्रा.से), डॉ. अशोक खनवटे, प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. अंजली छाब्रिया, शिक्षणतज्ञ मिनाक्षी बालसुब्र्यमण्यम, प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. समीर दलवाई आदींनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी नितीन पाटील यांनी राज्याच्या होऊ घातलेल्या धोरणांमध्ये या विशेष मुलांसाठी तरतुदी केल्या असून आता प्रत्येक सामान्य शाळांमध्ये विशेष शिक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे कळवले. डॉ. खनवटे यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सध्या भाषेत या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांनी व समाजानी काय केले पाहिजे हे तंत्रशुद्ध पद्धतीने सांगितले. यावेळी मुले आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ आणि मनोविकारतज्ञ असलेल्या डॉ. अंजली छाब्रिया यांनी या मानसोपचार आणि मनोविकार यांतील फरक आणि समाजामध्ये उपचाराबद्दल असलेला गैरसमज आणि भीती याबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यांनी असे विषद केले की, प्रत्येक व्यक्तीला मग तो डाऊन सिंड्रोम असो अथवा नसो, सल्ला व मार्गदर्शनाची गरज असते.

डॉ. समीर दलवाई यांनी डाऊन सिंड्रोम विद्यार्थ्यांचे शीघ्र निदान आणि धीघ्र हस्तक्षेप करून योग्य तो उपचार आणि थेरेपी देणे तसेच व्यक्तिमत्व विकासावर लक्ष देऊन पालकांनी या मुलांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत केली पाहिजे. मीनाक्षी बालसुब्रह्मण्यम यांनी या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध कला ,क्रीडा, योगा आणि नृत्य आदींच्या मदतीने मुलांचा व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी पालकांच्या संस्थेचे प्रमुख गोपाल सेहेजपाल प्रतिष्ठानचे विजय कान्हेकर, मिनिता पाटील,नंदकुमार फुले, मीना मुथा, श्यामश्री भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मणिहार भाटे यांनी आभार मानले.

आये फिर आये फिर से रानीला मेहमान या गाण्याने कार्यक्रम संपन्न झाला. अपंग हक्क विकास मंचचे विजय कसबे, रमेश सांगळे, रमेश मोरे, अनिल चाळके, महेश साळवी आणि मनिषा खिल्लारे यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft