जीवनमान सुधारणा आणि सुलभ स्वच्छता विषयावरती मार्गदर्शन


अनाम प्रेम, शोधना कन्सटन्सी, वॉटरइड इंडिया, अपंग हक्क विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथींसाठी जीवनमान सुधारणा आणि सुलभ स्वच्छता या विषयावरती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ३१ मार्च २०१८ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी १० ते ५ यावेळेत असून जीवनमान सुधारणा आणि सुलभ स्वच्छता या विषयावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दुस-या दिवशी रविवारी १ एप्रिलला तृतीयपंथीच्या कलागुणांचा मेला बोरिवली मधील वी. के. क्रिश्न मेमन शाळेच्या मैदानात भरविण्यात आला आहे. मेल्यामध्ये मुझीक, डान्स, लाईव्ह फूड स्टॉल, ज्वेलेरी, फॅशन, अशा विविध गोष्टी पहावयास मिळणार आहेत.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft