अपंग हक्क विकास मंच तर्फे
"दिशा सबलीकरणाचा" कार्यक्रम संपन्न...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, सहयोगी पालक संस्था नवी मुंबई आणि हेलन केलर इस्टीट्यूट डेफ फॉर अण्ड डेफ यांच्या संयुक्त विद्यमाने "दिशा सबलीकरणाची" या कार्यक्रमाचे चव्हाण सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला समीर घोष, सुधित पारेख, योगेश देसाई, प्रकाश बाळ आणि मीनल मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

इतनी शक्ति हमें देन दाता या सामूहिक गिताने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विजय कानेकर यांनी दिशा सबलिकरणाची ह्या कार्यक्रमाचे स्वरुप समजावून सांगितले, तसेच दिवसभरात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. त्यानंतर समीर घोष यांनी पाल्याला येत असलेल्या अडचणी उपस्थिताना संगीतल्या आणि घरातून पाल्याचा आदर करा म्हणजे त्याच्या सकारात्मक बदल होईल असा सल्ला त्यांनी पालकाना दिला.
मागील ३० वर्षापासून मी हे अनुभव घेत असून आम्ही त्याला चांगल्या वाईट गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. तसेच आम्ही त्याला देशाबाहेर आणि देशात कुठेही घेऊन फिरतो अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी सांगितली. कार्यक्रमाला आलेल्या विविध संस्थांच्या काही व्यक्तिनी आलेले अनुभव सांगितले. दुपारच्या सत्रानंतर मुलांकडून वर्कशॉप करुण घेतले.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft