दिव्यांग कट्टयाला उस्फुर्त प्रतिसादयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे अपंग हक्क विकास मंचातर्फे दर महिन्याला होणा-या आयोजित दिव्यांग कट्टयामध्ये "स्टॉलधारक अपंग व्यक्तींच्या समस्या" या विषयाला अनुसरुन या विषयावरती नूकतीच चर्चा झाली.

कट्टयामध्ये बृन्हमुंबई, अंबरनाथ, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार, बदलापुर या महानगरपालिका/ नगरपरिषदेतील अपंग व्यक्तींनी सहभाग घेतला, आपआपल्या महानगरपालिकेत, नगरपरिषदेत स्टॉलधारक अपंग व्यक्तींना मिळणा-या सोयी-सुविधा आणि निर्माण झालेल्या समस्यांची मांडणी करण्यात आली. रमेश कोळी यांच्या मदतीने पाठपुरावा करुन प्रतिष्ठानच्या माध्यमातुन बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या 24 वार्डाच्या स्टॉलधारक अपंगांची तपशीलवार माहिती प्राप्त केली असल्याचे अब्दुल्ला शेख यांनी सांगितले, त्याच धर्तीवर माहितीचा अधिकार अंतर्गत इतर नगरपालिकेतील स्टॉलसंदर्भातील सर्व माहिती मागविण्यासाठी अर्ज संबंधित नगरपालिकांना देण्यात आल्याची माहिती कट्टयाचे संयोजक शमीम खान यांनी दिली. तसेच बृन्हमुंबई महानगरपालिका व परिसरातील काही नगरपालिका, नगरपरिषदेच्या प्रत्येक वार्डमध्ये विषयाच्या अनुषंगाने एक संघटक नेमण्यात येणार असल्याचे मंचाचे अनिल चाळके यांनी सांगितले. या कामाला अधिक वेग येण्यासाठी प्रत्येक नगरपालिकेच्या हद्दीत या विषयावर साप्ताहिक बैठका घेण्यात येतील असे खान म्हणाले शेवटी उपस्थित सर्वांचे आभार अंबरनाथचे रवी कौल यांनी मानले.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft