दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने वाटपसासवड येथे आज अपंग बांधवांना कृत्रिम अवयव व साधने वाटप करण्यात आले. आज या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद बघून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंचामार्फत आम्ही अपंग बांधवांच्या हक्कासाठी, सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कामाचे समाधान वाटतं असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

जुलै महिन्यात बारामती येथे दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी मोजमाप नोंदणी शिबिरे घेण्यात आली होती, या शिबिरात अपंग व्यक्तींना आवश्यक साधने व कृत्रिम अवयव देण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती आणि मोजमाप घेण्यात आले होते. या शिबिरात बारामती तालुक्यात ३०८, दौंड तालुक्यात २५२, इंदापूर २३४, पुरंदर २७१, भोर ४५४, पौड २४४, खडकवासला ५९६ जणांची नोंदणी झाली होती. या सर्वांना या कार्यक्रमात कृत्रिम अवयव व साधने यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंचचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft