प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकाराने जुलै महिन्यात बारामती लोकसभा मतदारसंघात अपंग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी मोजमाप नोंदणी शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात अपंग व्यक्तींना आवश्यक साधने अथवा कृत्रिम अवयव देण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती आणि मोजमाप घेण्यात आले होते. या शिबिरात नोंदणी झालेल्यांची संख्या पुढीलप्रमाणे: बारामती तालुक्यात ३०८, दौंड तालुका २५२, इंदापूर २३४, पुरंदर २७१,भोर ४५४, पौड २४४, खडकवासला ५९६. या सर्वांना कृत्रिम अवयव अथवा साधने वाटप करण्यात येणार आहे.
अपंग बांधवांचे जीवन सुखकर व्हावे तसेच आपले आयुष्य त्यांनी सक्षमपणे जगावे यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा अपंग हक्क विकास मंच कार्यरत आहे. या माध्यमातून कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांनी आत्तापर्यंत राज्यभरात अपंग बांधवांसाठी शिबिरे घेतली आहेत तसेच कर्णबधिर व्यक्तींसाठी स्टारकी फाउंडेशन च्या सहकार्यातून डिजिटल श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहेत. सोमवारी होणाऱ्या या कार्यक्रमास पालकमंत्री श्री गिरीष बापट, सामाजिक व न्याय राज्यमंत्री श्री. दिलीप कांबळे, श्री. विजय शिवतारे राज्यमंत्री जलसंपदा व जलसंधारण, मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार दत्तात्रेय भरणे, खासदार वंदना चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नोंदणी केलेल्या सर्व अपंग बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक सुप्रियाताई सुळे व जिल्हा प्रशासन यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंचचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft