अपंग तपासणी शिबीर यशस्वीरीत्या संपन्न....
सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती


भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर पुणे जिल्हा परिषद, पुणे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विकास मंच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे आयोजित अपंग (दिव्यांग) व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी नाव नोंदणी व मोजमाप शिबीर आज जिल्हा रुग्णालय पौंढ येथे सहभागींच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या कार्यक्रमात तब्बल हजार दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी झाली आहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे यांची सर्व कार्यक्रमांना विशेष उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील अपंग व्यक्तींच्या विविध समस्या, संवाद व समन्वयाच्या भूमिकेतून सोडविण्यासाठी अपंग हक्क विकास मंचाकडून कार्य केले जाते. या मंचामार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत शिबिरांचे आयोजन करून सर्व प्रवर्गातील अपंगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साहित्य साधनांसाठीचे मोजमाप घेऊन, अपंगांना कृत्रिम अवयव व साधने वाटप मोफत उपलब्ध करून दिली जातात. या मंचामार्फत प्रत्येक अपंगांना त्यांच्या समस्येनुसार योग्य ती माहिती व सल्ला दिला जातो. अपंगांना आपल्या स्तरावरून सतत योग्य ते सहकार्य व मदत करण्याचा मंचाचा प्रयत्न असतो.

मागील तीन दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, सासवड, भोर-वेल्हे, खडकवासला, पौंड येथे सुरू असलेल्या कार्यक्रमाला तहसिलदार, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. शिबीराच्या यशस्वितेसाठी महात्मा गांधी सेवा संघाचे कर्मचारी, अपंग हक्क विकास मंच, संयोजक विजय कान्हेकर, अभिजीत राऊत, विजय कस्बे, यांनी अधिक परिश्रम घेतले.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft