साहित्य मंदिर सभाग्रृहात रंगणार ‘स्वरतीर्थ’..
पु. ल. देशपांडे, सुधीर फडके व ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मेघ मल्हार यांचा ‘स्वरतीर्थ’ हा कार्यक्रम शनिवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. साहित्य मंदिर सभाग्रृह, वाशी येथे आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे आयोजित करण्यात येणार्या या दर्जेदार कार्यक्रमाचा विनामूल्य आस्वाद घेता येणार आहे.
चित्रपट चावडीत अमेरिकन चित्रपट ‘रोप’चे प्रदर्शन...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचलीत एमजीएम फिल्म आर्ट्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमाअंतर्गत, शनिवार, दि. २३ फेब्रुवारी २०१९ रोजी सायं. ६ वा. ‘रोप’ हा चित्रपट चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृह, एमजीएम फिल्म आर्ट विभाग, एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.